नवी दिल्ली. अमित कुमार निरंजन
देशातील कोरोनाचे वाढते संकंट आणि लॉकडाऊनच्या काळात हजारो लोक स्वयंसेवक म्हणून अडचणीत असलेल्या लोकांची नि:स्वार्थ मदत करत आहेत. गेल्या काही दिवसांत सामाजित संघटनांच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर शेकडो लोकांना आपले नाव नोंदवले आहे, जेथे आरोग्य आणि प्रशासनाशिवाय कोणीही जाण्याचे धाडस तेथे हे लोक मदत करताहेत. वाचा अशा काही लोकांच्या या कथा -
नोएडा : घरात बंद वृद्धाची सेवा स्वत:च्या आई-वडिलांप्रमाणे
कोरोनाचा हॉटस्पॉट नोएडाचे सुभाजित भट्टाचार्य एचआर हेड आहेत. नोएडातील ७० वर्षीय एस.के.दास मधुमेही असून एकटेच आहेत त्यांनी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मदत मागितली. सुभोजित यांना ही माहिती मिळाली.आता शुभोजित त्यांना दूध, फळे, भाजी, औषधे अशी आवश्यक जिनसा पुरवत आहेत. ते म्हणतात, त्यांचे आई-वडील कोलकात्यात आहेत. मी येथे वृद्धांची मदत करतोय. कदाचित तेथे माझ्या आई-वडिलांनाही कोणी मदत करत असेल.
मुंबई: धोका पत्करून रोज ३०० जणांना अन्न पाकिटांचे वाटप
मुंबईचे स्वतंत्र लेखक २३वर्षीय अनीस ग्वांदे ऑनलाइन प्लॅटफाॅर्मद्वारे सध्या कोळीवाडा वरळी सारख्या हॉटस्पॉटमध्ये लोकांना अन्नाची पाकिटे पोहोचवत आहेत. संसर्गामुळे सील असलेल्या भागात ते रोज ३०० अन्न पाकिटे घेऊन जात आहेत. ते एका ठिकाणी हे ठेवतात. नंतर लोक येऊन ती पाकिटे घेऊन जातात. अनीस सांगतात की, या संसर्ग क्षेत्रात जाणे धोक्याचे आहे. मात्र अशावेळी देशासाठी जोखीम उचलणे आवश्यक आहे.
हैदराबाद : रेस्तराँमध्ये बनवत आहेत २००० जणांचे जेवण
शुभद्रा राणी आणि त्यांचे पति श्रीनिवास एका आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत.दोघांनी काही जणांना जेवण देण्यास सुरुवात केली होती. मात्र एके दिवशी घराबाहेर शेकडो मजूर जेवणाच्या आशेने जमा झाले. घरात हे शक्य नव्हते. तेव्हा शुभद्रा राणी यांनी जवळच्या रेस्तराँचे किचन खुले करायला लावले व तेथे जेवण तयार करणे सुरू केले. नंतर मित्र, शेजारी मदतीस आले.आता ते रोज दोन हजार लोकांचे जेवण तयार करत आहेत.