पिंपरी : संपुर्ण जगभरात थैमान घातलेला नोव्हेल करोना विषाणु ( Novel corona virus 2019 – nCov ) सध्या भारतात वेगाने पसरत आहे व हया आजाराची लागण आता पुण्यामध्ये देखील काही नागरिकांना झाली असल्याचे प्रसार माध्यमांमधून समजत आहे. मा. आयुक्त साहेब, मा. वैद्यकिय अधिकारी व आरोग्य अधिकारी यांनी आपल्या विभागामार्फत कोरोना आजार आटोक्यात येईपर्यंत संपुर्ण शहरभर कोरोनाबाबत काळजी घेणेबाबतची माहीतीपत्रक छापुन प्रत्येक घरो घरी वाटप करावेत व जाहीरातीमध्ये प्रसिद्ध करत रहावेत.
कोरोना विषाणुपासुन बचावासाठी संपुर्ण शहरात जगजागृती करा- शहर सुधारणा समिती सभापती राजेंद्र लांडगे